अहमदनगर: आमदारकीसाठी इच्छुक असणा-या सगळ्यांना शब्द द्या, पण कुणाला शब्द दिला ते दुस-याला सांगू नका. गत पन्नास वर्षे आम्ही हेच केले, असे विधान करत भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्यच बुधवारी नगर येथे उलगडले. विखे यांच्या या विधानाने व्यासपीठावरील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
नगर शहरात उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते. नगर मतदारसंघातून शिवसेनेकडून यावेळी अनेकजण इच्छुक होते. मात्र अनिल राठोड यांना उमेदवारी मिळाली. तो धागा पकडत विखे राठोड यांना उद्देशून म्हणाले, ‘तुमचे आता वय झाले आहे. पण एवढी घ्या मारुन अन् रिटायर व्हा. म्हणजे बाकी लोकांचे नंबर लागतील. आमदार व्हायचे असेल तर जे इच्छुक आहेत.

त्या प्रत्येकाला पुढच्या आमदारकीचा शब्द द्या. फक्त कुणाला शब्द दिला हे इतरांना कळू देऊ नका. पन्नास वर्षे आम्ही हेच राजकारण करत आलो आहोत. तुम्ही आमच्या सानिध्यात या’ असे ते म्हणाले.
- एप्रिल महिन्यात होणार नगर येथील नवीन विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन!
- भारतातील सर्वात स्वस्त 7 Seater Car ! आता घरी न्या फक्त 6 लाखांमध्ये
- 6550mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह Redmi K80 चा मार्केटमध्ये रेकॉर्ड
- दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार
- सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद