राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू माजी आमदार दादा कळमकर यांचे पुतणे, नगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले.
रात्री उशिरा झालेल्या या नाट्यमय प्रवेशामुळे नगर शहराच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अभिषेक कळमकर राष्ट्रवादीपासून दुरावले होते. त्यांनी शिवसेना प्रवेशासाठी संपर्क साधायला सुरुवात केली होती. बुधवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास ठाकरे यांची जाहीर सभा सुरू असताना आणि खासदार विखे यांचे भाषण सुरू असताना अभिषेक कळमकर यांची नाट्यमय पद्धतीने व्यासपीठावर एंट्री झाली.

तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले. ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना मोठा धक्का समजला जाऊ लागला आहे.
- एप्रिल महिन्यात होणार नगर येथील नवीन विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन!
- भारतातील सर्वात स्वस्त 7 Seater Car ! आता घरी न्या फक्त 6 लाखांमध्ये
- 6550mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह Redmi K80 चा मार्केटमध्ये रेकॉर्ड
- दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार
- सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद