नैराश्यातून पित्याकडून दोन मुलांची हत्या

Ahmednagarlive24
Published:

मुंबई : क्षयरोगाने ग्रासलेल्या पित्याला आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. आपल्याशिवाय मुलांच्या भवितव्याचे काय होणार? ही विवंचना त्याला सतावू लागली. परिणामी नैराश्यातून त्याने दोन्ही मुलांची हत्या करत स्वत:चेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला वेळीच रोखत अटक केली. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे.

घाटकोपरमधील इंदिरानगर विभागात वाहनचालक असलेला चंद्रकांत मोहिते हा भाड्याच्या घरात आपल्या कुटुंबासह राहत होता. चंद्रकांतला काही दिवसांपासून क्षयरोगाने ग्रासले होते. आजार बळावत असल्याने गेले काही दिवस तो नैराश्येत होता.

आपल्या पश्चात मुलांचा पत्नी नीट सांभाळ करणार नाही, अशी भीती होती. त्यामुळे त्याने मंगळवारी रात्री गौरवी (११) आणि प्रतीक (७) या आपल्या दोन मुलांना घेऊन स्विफ्ट कारमधून साताऱ्यातील आपल्या मूळगावी देवदर्शनाला जातो, असे सांगून बाहेर पडला. यानंतर रात्री साताऱ्याकडे येत असताना त्याने आपल्या भावाला फोनवरून आपण दोन्ही मुलांना मारणार असल्याचे सांगितले आणि स्वताच्या  दोन मुलांची हत्या केली. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment