नगर :- बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाराज असलेले राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
अभिषेक कळमकर हे राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. शरद पवारांच्या सभेनंतर झालेल्या प्रकरणानंतर आमदार जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांवर अभिषेक कळमकर नाराज होते.

अभिषेक कळमकर म्हणाले, मला तिकीट मिळालं नाहीये म्हणून मी इथे आलो असे नाही मला जी वागणूक दिली हे सर्वांनाच माहीत आहे, मी काळजावर दगड ठेवून आलो आहे अशी भावना राष्ट्रवादीचे आलेले माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली.
आता मी शिवसेनेत आलो आहे शिवसैनिक माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील व मला त्यांच्या कुटुंबामध्ये सामावून घेतील मी आता माझे मनोगत व्यक्त करणार नाही माझ्या भावना आहेत मी पक्ष तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी निवडणुकीनंतर निश्चित असे अभिषेक कळमकर यांनी सांगितले.
नगर शहरात अनिल भैया राठोड यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. वाघ हा अगोदर पिंजर्यात होता म्हणून त्याला कोणीही डिवचायचे मात्र आता वाघ पिंजर्याच्या बाहेर आला आहे असे म्हणताच जोरदार काड्यांचा कडगडाट होवून त्या वक्तव्याला शिवसैनिकांनी साद दिली. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे उध्दव ठाकरे, बबनराव पाचपुते, अनिल राठोड, अनिल शिंदे आदी उपस्थित होते.
अभिषेक कळमकर यांचा विधानभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत झालेला प्रवेश हा राष्ट्रवादीचे विधानसभेचे उमेदवार विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कळमकर यांचे नगर शहरामध्ये चांगले वर्चस्व आहे. तरुणांची मोठी फळी त्यांनी निर्माण केलेली आहे.
- पुणेकरांसाठी मोठी बातमी ! ‘या’ 6 मार्गांवर आता रात्रीच्या वेळी पण धावणार बस, पीएमपीच्या रातराणी बससेवेचा फायदा कुणाला?
- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! यावर्षी वेळेआधीच घेतली जाणार परीक्षा, बोर्ड परीक्षेचे नवं वेळापत्रक जाहीर
- ‘या’ 2 सरकारी कंपन्या आपल्या शेअरहोल्डर्सला देणार Dividend ची भेट, रेकॉर्ड डेट आत्ताच नोट करा
- पैसे काढण्याशिवाय ATM मधून कोण-कोणती कामे करता येतात ? वाचा….
- Work From Home च्या शोधात आहात का ? मग घरबसल्या ‘ही’ कामे करून तुम्हीही नोकरीपेक्षा जास्त कमाई कराल













