सुजय विखेंसाठी शरद पवारांनी नगरची जागा सोडली !

अहमदनगर :- सुजय विखे यांच्या मिशन लोकसभेतील जागा वाटपाचा घोळ आज मिटला आहे.नगर दक्षिण ह्या जागेवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपला हक्क सोडला असून ही लोकसभेची जागा काॅंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतल्याने सुजय विखेंचा मार्ग सुकर झाला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर लोकसभेची जागा काॅंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूज येथे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी नगर दक्षिणेतील गावोगावी प्रचार करत ओळख निर्माण केली आहे. दक्षिणेतून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

विखे हे ही जागा काॅंग्रेसला सोडावी, यासाठी सुरवातीपासून प्रयत्न करत होते. राष्ट्रवादीने सुरवातीला प्रतिसाद दिला नाही. मात्र आता काॅंग्रेसच्या मनाप्रमाणे जागा दिल्याने विखे पाटील यांच्या समोरील मोठा अडथळा दूर झाला आहे.