नागपूर :- मोबाइलवरील पबजी खेळाचे व्यसन लागल्यावर शैक्षणिक करिअर उध्वस्त होऊन नैराश्य आलेल्या नागपुरातील तरुणाने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली.
धाडीवाल लेआऊट परिसरातील अमन उर्फ बॉबी शंकर मानके (१९) गुरुवारी पहाटेच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडला.

जवळ असलेल्या सुयोगनगर चौकाजवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्येच्या आदल्याच दिवशीच अमनने हातावर ब्लेडने चिरे मारून घेतले होते. अमनने पूर्वी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता.
मात्र, त्याला पबजी खेळाचे व्यसन जडले होते. या खेळाच्या अतिआहारी गेल्याने त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते.
- लाडक्या बहिणींसाठी 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर ! ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
- सोने 35 टक्क्यांनी घसरणार, चांदीची किंमतही कमी होणार ! लक्ष्मीपूजनापर्यंत सोने स्वस्त होणार का ? तज्ञांचा मोठा अंदाज
- एका शेअरवर मिळणार 24 Bonus Share ! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा
- ‘हा’ 73 रुपयांचा शेअर पुढील बारा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल!
- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी Dividend मिळवण्याची शेवटची संधी ! किती लाभांश मिळणार?