कर्जत – जामखेड मतदारसंघात पालकमंत्री प्रा. राम शिंदे व रोहित पवार यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीतील विजयानंतर प्रा. शिंदे यांची हॅट्ट्रिक होणार तर पवार यांचा विजय राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.
या लढतीला विखे आणि पवार यांच्यातील सत्ता संघर्षाचीही झालर आहे. त्यामुळे भाजप तसेच राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ सेन्सिटिव्ह बनला आहे. जिल्ह्यातील मतदारसंघातून पवार कुटुंबातील सदस्याची पहिल्यांदाच एन्ट्री झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व कुटुंबियांसाठी हा विजय संपादन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रा. शिंदे यांनी आयोजित केलेल्या कर्जत येथील सभेत ही लढत रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी नसून, ती ‘बारामती’ विरुद्ध ‘लोणी’ अशी असल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे येथील सत्तासंघर्षची राज्यभर चर्चा आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये ना. शिंदे यांना विशेष परिश्रम घ्यावे लागले नाहीत.
विरोधी पक्षांमध्ये झालेल्या बंडखोरीचा त्यांना फायदा झाला. सध्या राष्ट्रवादीने सर्वांची मोट बांधत मोठे आव्हान दिले आहे. राम शिंदे यांना अनपेक्षितरित्या पवार कुटुंबातील उमेदवाराविरोधात लढा द्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही अत्यंत मुत्सद्देगिरीने त्याचा सामना केला जात आहे.
- सोलापूर ते गोवा प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार नवीन विमानसेवा
- AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेने शटडाऊनदरम्यान पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दुरुस्तीवर भर दिला
- Guru Aditya Rajyoga 2025 : गुरु आणि सूर्याच्या महामिलनाने नशिब चमकणार! ‘या’ महिन्यात 5 राशींच्या जीवनात येणार पैसा, यश आणि भरभराट
- सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गोंधळ! गणिताच्या पेपरमध्ये निम्मे पर्याय चुकीचे, विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत वाया
- कर्जतच्या नगराध्यक्षपदी घुले की शेलार? अचानक तिसऱ्या नावाचीही होऊ शकते निवड; आज होणार फैसला