अहमदनगर – शहर विधानसभा मतदार संघतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार भैरवनाथ तुकाराम वाकळे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि.17 ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीचे (जेएनयू) विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष तथा भाकपचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य कन्हैया कुमार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी 11 वाजता टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ही सभा होणार असून, या सभेची जोरदार तयारी चालू असल्याची माहिती राज्य सहसचिव अॅड.सुभाष लांडे यांनी दिली. युवकांमध्ये कन्हैया कुमार यांचे खास आकर्षण असून, ते सध्या भाकपचे स्टार प्रचारक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सभेसाठी युवक मोठी गर्दी करत असतात.

कन्हैया कुमार या सभेत सद्य राजकीय ,आर्थिक, सामाजिक परिस्थितीवर विचार मांडणार आहेत. या सभेला नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कॉ.शंकर न्यालपेल्ली, अॅड.सुधीर टोकेकर, दिपक क्षीरसाठ, सगुना श्रीमल, दिपक नेटके, चंद्रकांत माळी, तुषार सोनवणे, विजय केदारे, सुनिल ठाकरे यांनी केले आहे.
- किया सेल्टोससोबत ‘K.I.D.’ उपक्रमाचे पुनर्लाँच; सुरक्षित व जबाबदार ड्रायव्हिंगसाठी नवे डिजिटल पाऊल
- फेब्रुवारी 2026 स्मार्टफोन बाजारासाठी ‘हॉट’ महिना; फ्लॅगशिपपासून प्रीमियम मिड-रेंजपर्यंत अनेक मोठे लॉन्च
- अर्थसंकल्पाच्या आधीच सोन्या-चांदीला मोठा धक्का; वायदा बाजारात लोअर सर्किट, सामान्य ग्राहकांना दिलासा
- शेअर बाजारात विशेष व्यापार सत्र, गुंतवणूकदारांचे लक्ष ठरलेल्या टॉप स्टॉक्सकडे
- आयफोन 16 आजही लोकप्रिय; जगात आणि भारतात सर्वाधिक विक्रीचा दावा












