कोपरगाव :- लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपी आकाश रमेश रानशूर (कोपरगाव) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपी आकाश रानशूर याला पाच दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
शहरालगत असलेल्या सोनार वस्ती येथे राहणाऱ्या आकाश रमेश रमेश रानशूर याने आपल्या घरी धुणे-भांड्याचे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. या गुन्ह्यात आकाश याचा मित्र दीपक खरताळे या दोघा आरोपींविरुद्ध पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
घडलेल्या गुन्ह्याची तीव्रता पोलिसांनी लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी आकाश रानशूर याला बेड्या ठोकण्यात यश मिळवले. आरोपी आकाश रानशूर याला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.