कर्जत :- तालुक्यातील रजपूतवाडी येथील शेतकरी लक्ष्मणसिंग विठ्ठलसिंग परदेशी (वय ४८ वर्षे) या शेतकऱ्याने दुष्काळामुळे बँकेचे कर्ज थकले असून शेत नापीक राहिले. तसेच कामाचा आतिरिक्त ताण आल्यामुळे अखेर त्यांनी राहत्या घरामध्ये फाशी घेतली.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे कोरेगाव व रजपूतवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शोकाकूल वातावरणामध्ये त्यांच्यावर अत्यंसस्कार करण्यात आले.
