अहमदनगर :- लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. डॉ. सुजय विखे यांचे आघाडीत काहीही योगदान नाही.
त्यामुळे ते भाजपमध्ये गेल्याने काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले. पूर्वी गाजलेल्या एका निवडणुकीचे उदाहरण देऊन विखेंचा पराभव होऊ शकतो हे सांगताना त्यातून उदभवलेल्या खटल्याची आठवणही पवारांनी सांगितली.
पुण्यातील पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, ‘अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार. ती काँग्रेसला सोडण्याचे कारण नाही.
या मतदारसंघात पूर्वी आम्ही बाळासाहेब विखे यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे या जागेवर विखे निवडून येऊ शकतात असे कसे म्हणता येईल.
डॉ. सुजय यांचे काँग्रेस आघाडीत काहीच योगदान नाही, त्यामुळे ते भाजपमध्ये गेले म्हणून आम्हाला काहीही फरक पडणार नाही’.