औसा : मराठवाडा आणि राज्यात शेतकऱ्यांना पीकविमा न देणाऱ्या विमा कंपन्यांना १,१०० कोटींचा नफा झालाच कसा, असा सवाल करीत यात सरकारने टाळूवरचे लोणी खाल्ले, असा आरोप करून या सरकारला राज्यातील शेतकरी व जनता नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ लामजना (ता. औसा) येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, खा. हुसेन दलवाई, प्रवक्ते सचिन सावंत, उमेदवार आ. बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपती काकडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी व आघाडीतील घटक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते.. राज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांनी बसच्या पाससाठी पैसे नाहीत, म्हणून आत्महत्या केल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास पीकविम्यासाठी मुंबईत मोर्चा काढला खरा, पण त्यांनी जहाजांचा विमा काढणाऱ्या कंपनीकडे निवेदन दिले, असे सांगून नौटंकी करून शेतकऱ्यांना त्रास दिला, अशी टीकाही त्यांनी केली.. यावेळी बोलताना काँग्रेस पक्ष प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, मंदीमुळे बेरोजगारी वाढत आहे. ७५ टक्के नोकऱ्या कमी केल्या. १०० पटीने भ्रष्टाचार करून लाखो पटीने या सरकारने थापा मारल्या.
जनतेचा आवाज बंद करणाऱ्या सरकारची गुरमी या निवडणुकीत उतरवा आणि काँग्रेस आघाडीला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खा. हुसेन दलवाई यांनी सच्चर समितीच्या शिफारशी अमलात आणून अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
- भारतातील सर्वात स्वस्त 7 Seater Car ! आता घरी न्या फक्त 6 लाखांमध्ये
- 6550mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह Redmi K80 चा मार्केटमध्ये रेकॉर्ड
- दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार
- सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद
- जेवणासाठीच नव्हे, तर कांद्याचे इतर ५ फायदेही जाणून घ्या