काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था जेलरसारखी

Published on -

सोलापूर : राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे. ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी बचे तो पिछे आओ!’ असे म्हणण्याची पाळी या नेतृत्वावर आली आहे. राज्यातील भाजपा-शिवसेना महायुतीने गेल्या पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे विरोधकांना आमच्या विरुद्ध लढण्याची ताकदच राहिली नाही.

राज्यात व देशात पुढील २५ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच राज्य करेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. . नातेपुते येथील पालखी मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या १५ वर्षांत काँग्रेस-­राष्ट्रवादीने जेवढे काम केले नाही तेवढे काम आम्ही गेल्या पाच वर्षांत पूर्ण केले आहे.

मराठा, मुस्लिम, लिंगायत, धनगर या समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. शेती, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य यासाठी विशेष करून काम केले आहे. आता दुष्काळमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आलो आहे. या सगळ्या योजना पूर्ण करण्याचे काम सुधाकर परिचारक यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रस्ते बनवले. पाच वर्षात गरिबांना घरे बांधून दिली, पाणी मिळवून दिले.

२०२२ पर्यंत महाराष्ट्रातील एकही गरीब घरापासून वंचित राहणार नाही. हे सामान्यांचे, गरिबांचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे. संत बसवेश्वर, चोखामेळा यांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्णत्वाला नेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe