पराभवाची जाणीव झाल्यामुळे दल बदलूंनी पक्ष बदलला

Ahmednagarlive24
Published:

वैराग (सोलापूर): कोणत्या पक्षावर बोलावे यावर बार्शी तालुक्यात येण्यापूर्वी बाहेरच्या नेत्यांना विचार करावा लागतो. पराभव रणात नाही तर मनात होतो. त्यातूनच त्यांना पराभवाची जाणीव झाल्यामुळे दल बदलूंनी पक्ष बदलला, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वैराग येथे केली.

राष्ट्रवादीचे बार्शीचे उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर यांच्या प्रचारार्थ बोलताना ते पुढे म्हणाले, ही निवडणूक दोन विचारांची आहे. तरुणांच्या आणि महाराष्ट्राच्या भवितव्याची आहे. पाच वर्षात सत्तेवर असलेल्या सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडला.

प्रत्यक्षात कुणाच्याच पदरात काहीच पडले नाही. मात्र आमची सत्ता येताच तिन महिन्यात सात-बारा कोरा, केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, उच्च शैक्षणिक कर्ज बिनव्याजी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment