राहुरी शहर : माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तालुक्यात अनेक पाणी योजना शासनाकडून मंजूर करून त्या कार्यान्वित केल्या. आज जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई असताना राहुरी तालुक्यात अपवादात्मक ठिकाणी टँकर सुरू होते. आमदार कर्डिले १० वर्षांपासून तालुक्याचे आमदार होते. या काळात त्यांनी एक तरी पाणी योजना राबविली का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केला.
तनपुरे काल राहुरी तालुक्यातील डिग्रस, पिंपरी अवघड, गोटुंबे आखाडा या ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी, कॉर्नर सभाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. भास्कर तोडमल होते. यावेळी सरपंच कविता भिसे, राज्य महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा निर्मला मालपाणी, परशराम तोडमल, साहेबराव तोडमल, मुळा-प्रवराचे माजी संचालक अय्युब पठाण उपस्थित होते.. तनपुरे म्हणाले, गेली १० वर्षे तालुक्याबाहेरचा आमदार निवडून दिला. यावेळी तालुक्यातील उमेदवाराला संधी द्यायची. हा निश्चय सर्वांनी केला आहे. तरुण वर्गाचा याला पाठिंबा आहे.
आ. कर्डिले सांगतात, तालुक्यात विकास कामांसाठी १२०० कोटी रुपयांचा निधी आणून विकास केला. याचा अर्थ तालुक्यातील प्रत्येक गावासाठी १५ ते २० कोटी रुपये वाट्याला येतात. मग राहुरी खुर्दमध्ये किती विकास झाला, किती रस्ते झाले? त्यांनी सर्व कामांचा हिशेब द्यावा. राहुरी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जिल्हा परिषदेने उभी केली, पण या कामाचे श्रेय आमदार घेऊ पाहत आहेत. याचे सर्व श्रेय ते घेत असतील, तर या केंद्रात तसेच म्हैसगाव येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर नाहीत, कर्मचारी नाहीत, ते भरण्याची जबाबदारी कोणाची? जो आमदार तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा देऊ शकत नाही, त्याने १२०० कोटी रुपयांचा निधी आणल्याच्या गप्पा मारू नयेत.
राहुरी खुर्द येथे साधी स्मशानभूमी नाही. येथील लोकांना दहाव्यासाठी राहुरी येथे यावे लागते. हे आमदार कार्यसम्राट नाहीत, तर फोटोसम्राट आहेत. यावेळी जनतेने निर्णय घ्यायचा आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला उमेदवार निवडून आणायचा की, स्वच्छ प्रतिमा असलेला सुशिक्षित तरुण निवडून द्यायचा. हा निर्णय आपण सर्वांनी २१ ऑक्टोबर रोजी घ्यावा व मला सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन तनपुरे यांनी केले.
- FasTag Rules Change : फास्टॅग नियमांमध्ये १ एप्रिल २०२५ पासून बदल !
- Solapur Pune Highway : सोलापूर ते पुणे महामार्ग होणार सहापदरी ! तीन उड्डाणपूल
- गुगलचा वापर करताना जरा सावधान! गुगलवर घ्याल ‘या’ गोष्टींचा शोध तर खावी लागेल तुरुंगाची हवा; जाणून घ्या माहिती
- FasTag Rules 2025 : फास्टॅग नियमांमध्ये झाले मोठे बदल ! वाहतूक कोंडी…
- नवीन सिमकार्ड घेण्यासाठी करावे लागणार आता ‘हे’ काम! पीएमओने दूरसंचार विभागाला जारी केल्या सूचना