कर्जत : आपण गेली पाच वर्षे काम केले म्हणून काही चुका झाल्या असतील ज्यांनी कामेच केली नाहीत. त्यांच्या चुका कोणत्या होणार यांनी कोणती कामे केली तर फक्त काटा मारला, भाडे थकवले व आता कोणते कामे सुरू आहेत. तर चॉकलेट, पॅड, घोंगते वाटप, विधानसभा ही काय लुटुपुटूची लढाई आहे काय, असा प्रश्न उपस्थित करत ना.प्रा.राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवाराचे नाव न घेता टीका केली.
कर्जत तालुक्यातील कुळधरण, बारडगाव परिसरातील ग्रामस्थांशी ना.शिंदे यांनी संवाद साधल. करमनवाडी येथे गणपत सायकर यांनी प्रास्ताविक करताना गेली अनेक वर्षे सत्ता असताना त्यांनी कर्जत जामखेडचा विकास का केला नाही. असा प्रश्न उपस्थित करत फक्त येसवडी चारीचे पाणी करमनवाडी पर्यंत यावे एवढीच अपेक्षा व्यक्त केली. दादा सोनमाळी म्हणाले आपली एक चूक दहा बारा वर्षे मागे नेऊ शकते. जिल्ह्यातील विखेंना बाहेरचा उमेदवार म्हणणारे हे स्वत: दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन कसे लढू शकतात. असा प्रश्न उपस्थित केला. या बाहेरच्या उमेदवाराला आपल्याला बाहेर काढायचे आहे असे म्हटले.

राजेंद्र देशमुख यांनी तुमच्या घरातील भांडणे आमच्या मुळावर का आणता. असे म्हणत जोरदार टीका केली. दादाभाऊ चितळकर यांनी निवडणूक राम शिंदेच्या अस्तित्वाची नाही तर आपल्या अस्तित्वाची आहे. कुकडीच पाणी आत्ताच नीटनेटके का मिळते आहे. घरच्या माणसाकडूनच आपण अपेक्षा करतो. त्यामुळे आपल्या पूर्वीपेक्षा अपेक्षा वाढल्या असून सर्वानी चिंतन केले पाहिजे. शेवटी ना. प्रा. राम शिंदे म्हणाले, आगामी दोन वर्षात साखर कारखानाच काढतो, २०२१ ला त्याचे पाहिले गाळप निघाले पाहिजे असे फास्ट काम करणार आहे. म्हणजे लोकांच्या हक्काचा कारखाना होईल कारण आपल्या तालुक्यात जो लोकांचा कारखाना होता.
तो तर यांनीच कवडीमोल भावाने विकत घेतला. आगामी काळात दिवाळी येणार आहे घरा घरात जे येणार आहे ते नाकारू नका कारण एकदा हे गेले की परत हिकडं फिरकून बघणार नाहीत. माझा माझ्या मतदार संघातील लोकांवर विश्वास आहे.जे कधी मिळत नव्हते ते मिळवून देण्याचा प्रयत्न केला आह. म्हणूनच आपली मंत्रीपदाची सीट राखीव केली गेली आहे. मी तर भाग्यवान आहेच पण आपला मतदारसंघ ही भाग्यवान असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे उमेदवाराचे नाव न घेता जोरदार टीका केली.
- मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….
- IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती! 10,277 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही
- अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना