पाच वर्षानंतर निवडणुकांपुरता लोकांसमोर येत नाही

Ahmednagarlive24
Published:

करंजी : पाच वर्ष घरी बसायचं आणि निवडणूक लागल्या की काहीतरी भावनिक मुद्दे घेवून मतदारांसमोर जायची पद्धत आता बंद झाली. बीड जिल्ह्याला पाणी देण्याचा प्रश्नच नाही. परंतु राहुरीकरांची निवडणूकीपुर्ती सहानूभूती मिळवण्याचा उद्योग विरोधी उमेदवार करत असून, मी गेली पंचवीस वर्षापासून आमदार आहे. त्याचे कारण मी बाराही महिने सर्वसामांन्य जनतेमध्ये असतो. या निवडणुकीत फॉर्म भरण्याचीच मानसिकता तनपुरेंची नव्हती.

पक्ष श्रेष्ठींनाही याची खात्री येत नव्हती, विश्वास नसल्याने मामा (माजीमंत्री जयंत पाटील यांना) हेलिकॉप्टरने राहुरीला यावे लागले. अशी बोचरी टीका श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे प्रचाराचा नारळ वाढविताना आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केली. मते नाही मिळाली तरी चालतील. पण वांबोरी पाईप चारी फोडुन पाणी घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कणखर भुमिका मागेही घेतली. पुढे ही राहील. असे स्पस्ट करून आमदार कर्डिले म्हणाले की, सार्वजनिक वैयक्तिक विकासांतर्गत कामाबरोबरच जनतेच्या सुखदु:खात सातत्याने मी लोकांत असतो. विरोधकांसारखा पाच वर्षानंतर निवडणुकांपुरता लोकांसमोर येत नाही.

फॉर्म भरण्याची विरोधकांची मानसिकता नव्हती.ही त्यांचेवर लादलेली उमेदवारी असल्याची पुष्टी जोडत मागील पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारकडूुन भरीव विकास निधी मतदारसंघासाठी आणल्याचे आ.कर्डिले म्हणाले. . विकासकामे करण्यासह प्रत्येकाच्या सुखदु:खात जाण्याची सवय असलेले लोकप्रतिनिधी म्हणून आ.कर्डिले यांचा आदर्श आता राज्यात अंगिकारला जात असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी यावेळी सांगितले.

प्रथम वडील नंतर आई आणि आता पुत्र प्राजक्त तनपुरे विधानसभेला भविष्य आजमावीत असले, तरी पाथर्डी तालूक्यातील ३९ गावच्या सर्व कार्यकर्त्यांनी आ.कर्डिले यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन आ.राजळे यांनी यावेळी केले. पाच वर्षांतून एकदाच मतांची झोळी घेवुन जायची. ही निवडणूकांपुर्ती हंगामी दुकानदारी आता बंद करा. असे आवाहन वृध्देश्रर देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे यांनी विरोधकांना केले. वृद्धेश्वराची विधीवत महापुजा करून आ.कर्डिले यांनी ३९ गावांत प्रचाराचे रणशिंग फुंकले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment