शरद पवार दोषी नाहीत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोणत्याही संस्थेमध्ये थेट नाहीत मात्र, त्यांना गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी वेळप्रसंगी कायद्याची व्याख्या ह्या सरकारणे बदलली. शरद पवार व्यक्ती दोषी कसे? ते दोषी असतील तर मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा, पंतप्रधान यांनी जर घोटाळे केले असतील तर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांना दोषी धरणार का? असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र कांगो यांनी केला.

नगर येथे आज पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार बहिरनाथ वाकळे, शंकर नालपल्ली, सुभाष लांडे, अर्षद शेख, अंबादास दौंड, नीलिमा आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment