जामखेड :- चार वर्षांपूर्वी उसने दिलेले एक लाख रुपये मागितल्याच्या कारणावरून खर्डा येथे बाळु बजरंग पवार या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी एकूण पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन बंद मागे घेण्यात आला.याबाबत बाळु पवार याची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी जामखेड पोलिसात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बिभीषण वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, व राहुल गौतम तादगे (सर्व रा. खर्डा) या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
- दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार
- सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद
- जेवणासाठीच नव्हे, तर कांद्याचे इतर ५ फायदेही जाणून घ्या
- 2025 मध्ये सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या बाइक्स! कमी किंमत, जबरदस्त मायलेज
- पेट्रोल आणि डिझेल कार ओळखायची आहे? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरा!