कोपरगाव : विधानसभा मतदारसंघात परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पंचनामे सुरू आहेत; मात्र सरसकट पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळवून द्या, असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांना घातले आहे.
पवार यांना दिलेल्या निवेदनात आ. काळे यांनी म्हटले आहे, की सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, कांदा रोप आदी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाकडून मदत मिळेल या आशेवर शेतकरी बसलेला आहे.

नुकसानीचे सरसकट पंचनामे करून या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ढिगारे लावलेल्या पिकांची मळणी वेळेवर न झाल्यामुळे या पिकांना मोड फुटले असून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतानादेखील पिकांचे पंचनामे होत नाहीत. त्यामुळे आपण नुकसान भरपाईपासून वंचित राहणार या भीतीपोटी शेतकरी हवालदिल झाला आहे.
पीक विमाधारक शेतकऱ्यांना कागदपत्राच्या जाळ्यात न अडकविता महसूल मंडलामार्फत केलेला पंचनामा ग्राह्य धरून मदत देण्यात यावी. रब्बी हंगामाची पिके उभी करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पंचनामे व्हावेत, व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरघोस नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असे काळे यांनी म्हटले आहे.
- भारत – पाकिस्तान तणावामुळे काजू, बदामचे भाव वाढलेत ! ड्रायफ्रूटचे रेट किलोमागे ‘इतके’ वाढले, काजू बदामचे सध्याचे रेट कसे आहेत ?
- डॉ. अनिल बोरगे यांनी अपहार उघड झाल्यानंतरही पोलिसात फिर्याद देऊन गुन्हा दाखल का केला नाही ?
- बाळासाहेब थोरातांचे वक्तव्य पराभवाच्या वैफल्यातून, आमदार अमोल खताळ यांची जोरदार टीका
- अहिल्यानगरमध्ये रानडुक्कर आणि सश्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ; बिबटे, तरस आणि कोल्ह्यांचा मुक्त संचार
- SBI ची FD योजना बनवणार मालामाल ! 12 महिन्यांच्या एफडी योजनेत 1 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?