नाशिक : परतीच्या पावसाने हाहाकार माजविलेला असल्यामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यात अतिपावसामुळे कांदा सडल्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटली आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी घेत प्रतिक्विंटल ४५८१ रुपये भाव गाठला आहे. परतीच्या पावसामुळे भाजीपाला महागलेला असताना कांद्याने पुन्हा भाव खाल्ल्यामुळे महिलावर्गासह सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
गेल्या आठवड्याभरापासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा सडला आहे. याशिवाय दक्षिणेकडील कांद्याचीदेखील आवक घटली आहे. बुधवार पाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी ५८० रुपये प्रतिक्विंटल भाववाढ गाठत गुरुवारी (दि.३१) लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी ४१०० रुपये भाव मिळाला. परतीच्या तडाख्यामुळे बाजार समितीत कांदा आवक घटली आहे. गुरुवारी केवळ ६९ वाहनांतून ७१५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे किमान २००० हजार ते कमाल ४५८१ रुपये भाव कांद्याला मिळाल्याने सरासरी ४१०० रुपये भाव मिळाल्याची नोंद करण्यात आली.

पावसामुळे आवक घटली. याशिवाय दक्षिणेकडील राज्यातून होणाऱ्या आवकेतदेखील घट झाल्याने कांद्याने मुसंडी घेतली आहे. गेल्या पंधरवड्यातदेखील कांद्याने ४५०० रुपयांचा भाव ओलांडला होता. कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी परतीच्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- Explained : विखे-थोरात पुन्हा समोरासमोर ? ZP निवडणुकीत लागणार खऱ्या ताकदीचा कस
- साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत खा. नीलेश लंके यांची भारतीय लष्करासाठी प्रार्थना
- नवीन कार खरेदी करण्यासाठी SBI कडून 15 लाखाचे कर्ज घेतले तर किती रुपयांचा EMI भरावा लागणार?
- IDBI Bank मध्ये 676 पदांची जंम्बो भरती; पात्रताही अशी की अनेकांना भरता येणार अर्ज
- चार्गिंगचं झंझट संपलं… आला 10000 mAh बॅटरीवाला फोन; प्रोसेसरही असा की, चालतो दणादण