श्रीगोंदा तालुक्यात भरदिवसा घरफोडी

Published on -

श्रीगोंदा : तालुक्यातील सुरोडी येथील रहिवासी संजय भाऊ वागस्कर यांच्या घरी दि.९रोजी दिवसा दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी डल्ला मारत, घराच्या कपाटातील दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३५,०००रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

या घरफोडीबाबत वागस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, दि.९रोजी वागस्कर हे पत्नीसह दुपारी एक वाजता घराला कुलूप लावून श्रीगोंदा येथील आठवडा बाजारासाठी गेले होते.

ते सायंकाळी पाच वाजता वागस्कर हे घरी परत आले तेव्हा त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटून खाली पडलेले दिसले. त्यामुळे शंका आल्यामुळे वागस्कर यांनी घरात जाऊन पाहणी केली असता कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३५,०००रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले. 

याबाबत वागस्कर यांनी काल श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe