संगमनेर : शहरातील एका रस्त्यावर विजय अण्णासाहेब दिघे (वय २४, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) याने एका एकवीस वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास विजय अण्णासाहेब दिघे याने तरुणीचे तोंड दाबून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
यावेळी तरुणीने विरोध केला असता विजय दिघे याने तिला जोराने ढकलून दिले.
याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी विजय अण्णासाहेब दिघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.