पाथर्डी :- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मी बहीण आहे. पंकजा व माझ्यात मतभेद नाहीत. गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद व पंकजा मुंडे यांचे सहकार्य मी जन्मभर विसरू शकत नाही.
पाथर्डी-शेवगाव दोन्ही तालुके मला कुटुंबाप्रमाणे वाटतात. फसवाफसवी हा आपला विषय नाही. लोकांना फसवल्यावर काय अवस्था होते त्याचा अनुभव विरोधकांनी घेतला आहे, अशा शब्दांत आमदार मोनिका राजळे यांनी तालुक्यातील वंजारी मतदारांशी संवाद साधला.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा प्रारंभ आमदार राजळे यांनी शहरातील श्रीक्षेत्र खोलेश्वर देवस्थान येथे पूजा करून केला.
यावेळी भाजपचे विस्तारक दिनकर गर्जे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नंदकुमार मोरे, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य ललिता शिरसाठ,
उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, काशिनाथ लवांडे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंकुश चितळे, रासपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब उघडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष घोरपडे,गजानन कोष्टी आदी उपस्थित होते.
- संगमनेरमध्ये सुरू झाली मोठी लढाई ! थोरात-खताळ लढाईचा नवा अध्याय
- Kia Sonet वर भन्नाट ऑफर ! 2 लाखांत कार तुमची… विश्वास बसणार नाही अशी ऑफर!
- आनंदाची बातमी ! 589 किमीचे मुंबई-गोवा अंतर आता फक्त 6 तासात कापले जाणार; रेल्वेने नाहीतर समुद्रमार्गे सुपरफास्ट प्रवास, कधी सुरु होणार जलवाहतूक ?
- Navpancham Rajyog : एप्रिलमध्ये घडणार मोठी घटना ! नवपंचम राजयोगाने 3 राशींचे नशीब बदलणार
- Vastu Tips | तुम्ही तुमच्या पर्समध्ये ‘या’ वस्तू ठेवल्यात तर 100% कर्जबाजारी व्हाल, कितीही कमवा पण हातात पैसा राहणार नाही