अहमदनगर :- महापालिका निवडणुकीत झालेल्या केडगावची पुनरावृत्ती आता लोकसभा निवडणुकीत होणार आहे.
सत्ता नसताना वर्षानुवर्षे काँग्रेसबरोबर संघर्ष करणारे भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ. सुजय विखे यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसबरोबर मांडीला मांडी लावून बसणार आहेत.

हे दिवस पाहण्यासाठीच आम्ही संघर्ष केला का? असा प्रश्न भाजपमधील जुने निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते आता करत आहेत.