वृद्ध कलावंतांचे थकीत मानधन तात्काळ उपलब्ध करून द्या

Published on -

यवतमाळ : राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात एकूण ८०० वृद्ध कलावंत आहेत.

यांचे मानधन मागील ६ महिन्यांपासून थकीत होते. ही बाब निवेदनातून वृद्ध कलावंतांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावर तात्काळ पुढाकार घेत पालकमंत्र्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या संचालकांसोबत चर्चा केली. तसेच या वृद्ध कलावंतांचे मानधन तात्काळ जमा करण्याच्या सूचना दिल्या.

त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ८०० वृद्ध कलावंताच्या खात्यात त्यांच्या मानधनाची रक्कम त्वरित जमा करण्यात येईल, असे विभागाचे संचालक यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील वृद्ध कलावंत व साहित्यिक यांना दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe