भाजपा-शिवसेना विधानसभा एकत्रित लढवणार

Ahmednagarlive24
Published:

कराड : शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये विधानसभा निवडणुकीतील युती संदर्भात नीटपणे संवाद सुरू आहे. कोणी काही म्हटले तरी येणारी निवडणूक आम्ही एकत्रितपणे लढवू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाजनादेश यात्रेनिमित्त रविवारी कराड येथे मुक्कामी आल्यानंतर सोमवारी सकाळी ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांतदादा पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. पृथ्वीराज देशमुख, ना. डॉ. अतुल भोसले, माजी खा. उदयनराजे भोसले आदींची उपस्थिती होती.

यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचे मुख्यमंत्री ना. फडणवीस आणि ना. चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. . मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या १९ दिवसापासून महाजनादेश यात्रा सुरू आहे.

यात्रेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. आत्तापर्यत विधानसभेच्या ११२ मतदार संघातून ३१८९ कि.मी. प्रवास झाला आहे. ही यात्रा आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मार्गस्थ होणार आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता.

मात्र, भविष्यात तो भाजपाचा होईल इतका मोठा प्रतिसाद यात्रेला सातारा जिल्ह्यात मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. सह्याद्रिच्या डोंगररांगात यावर्षी पडलेल्या अतिवृष्टीमुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला. त्याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. यावर्षी पावसाने सर्व उच्चांक मोडले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment