अहमदनगर :- लष्करी भागातील अधिकाऱ्यांचे निवासस्थान येथे लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीला अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी कॅप्टन जे. सुरेश यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लष्करातील अधिकाऱ्याच्या पत्नीने याबाबत फिर्याद दिली आहे. अधिकारी निवास असलेल्या ऑफिसर एन्क्लेव्ह, जे. के. रोड येथे हा प्रकार घडला.
फिर्याद देणारी महिला सोमवारी सांयकाळी आपल्या घरातील बाल्कनीमध्ये बसली होती. त्या वेळी कॅप्टन जे सुरेश यांनी आपल्या घराच्या लॉनवर येऊन फिर्यादीकडे पाहून अश्लील हावभाव करून अश्लील शेरेबाजी केली. तसेच महिलेला, ‘पाहून घेऊ,’ अशी धमकी दिली.
त्यानंतर महिलेने अधिकारी असलेल्या पतीला ही बाब सांगितली. त्यानंतर महिलेने भिंगार पोलिस स्टेशनला येऊन कॅप्टन सुरेशविरुद्ध विनयभंग करणे, धमकी देणे या कलमानुगार गुन्हा नोंदविला आहे.