भाजप प्रवेश झाला आता सुजय विखेंसमोर आहे ‘हे’ आव्हान.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- दक्षिण लोकसभा मतदार संघात डॉ. विखेंना उमेदवारी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी शहर भाजपमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे शहरातून मोठे मताधिक्य मिळवण्याचे आव्हान डॉ. विखेंसमोर असणार आहे. पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधून डॉ. विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत अद्याप उघड नाराजी व्यक्त केली जात नाही.

उलट युवा नेतृत्व असलेल्या सुजय विखेंना आघाडीने उमेदवारी नाकारून अन्यायच केला होता, म्हणून नाईलाजास्तव भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले आहे.

ज्या पक्षाचे महाजन नेते आहेत, त्या पक्षाच्या पालकमंत्र्यांनाही डॉ.सुजय यांच्या प्रवेशाच्या प्रक्रियेपासून अलिप्त ठेवल्याची चर्चा भाजपच्या सध्या गोटात सुरु झाली आहे.

दरम्यान, मुंबईत डॉ.विखेंनी भाजपत प्रवेश केल्यानंतर नगर शहर व जिल्हा भाजपमध्ये मोठा सन्नाटा पसरला आहे.

डॉ.सुजय विखे यांच्या प्रवेशाचं चांगभलं केलं. मात्र, त्यात अख्खी भाजपच विखेंच्या दावणीला बांधली जातेय की काय, अशी शंका खुद्द भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना सतावू लागली आहे. 

विखे यांच्या भाजप प्रवेशाने शहर व जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

मनपा निवडणुकीत भाजपतील आगरकर गट शिवसेनेबरोबर होता. पण गांधी गटाने आमदार शिवाजी कर्डिलेंच्या मदतीने राष्ट्रवादीला बरोबर घेत सत्ता स्थापन केली. 

त्यावेळी भाजप गांधीगट व शिवसेना यांच्यातील अंतर्गत विरोध अधिक स्पष्ट झाला होता. पण डॉ. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर शिवसेना युती धर्म पाळणार का ? असा सवाल उपस्थित झाला आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment