अहमदनगर :- विरोधक उमेदवार म्हणतात २५ वर्षाचा हिशोब द्या. पण हे त्यांना माहित नाही कि त्यांचे वडील ७ वर्ष नगरअध्यक्ष होते. दहा वर्ष विधानपरिषद आमदार. उमेदवार स्वता ४ वर्ष महापौर आणि पाच वर्ष आमदार होते मग २६ वर्ष त्यांनी नगरकरांसाठी काय केले याचा हिशोब द्यावा.
राज्यात २० वर्षापासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता होती त्यावेळी यांनी नगरच्या विकासासाठी किती निधी आणला आणि नगर शहरात काय विकास केला हे सांगावे. नगर शहारत शिवसेनेने केलेल्या जनहिताच्या कामामुळे जनतेने २५ वर्ष अनिल राठोड यांना आमदार केले. असे प्रतिपादन नगरसेवक योगीराज गाडे यांनी केले.

महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ प्रोफेसर चौक येथे चौक सभा घेण्यात आली. तसेच प्रचारफेरी काढून नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी अॅड. अभय आगरकर, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, सदाशिव देवगावकर, बाबा सानप, गुरु कुलकर्णी, मिलिंद गंधे, मुकुंद गंधे, अभिजित दरेकर, रवी वाकळे, अक्षय कातोरे, गिरीष जाधव, पराग गुंड, ओमकार पछाडे, महेश आनेचा, पांडुरंग दातीर, डॉ. चंद्रकांत बारस्कर सह महायुतीचे सदस्य उपस्थित होते.
गाडे पुढे म्हणाले शिवसेनेने २५ वर्ष नगरच्या नागरिकांना काय दिले हे त्यांना माहित आहे. आणि २०१४ पासून २०१९ या पाचवर्षात नगरमध्ये विकास तर नाहीच पण गुंडांनी नगरमध्ये केडगावात हत्याकांड केले आणि पोलीस अधीक्षक कार्यालय फोडले, त्यामुळे नगरचे नाव संपूर्ण भारतात मलीन करण्याचे काम कोणी केले हे जनतेला माहित आहे.
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही
- अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना
- नेवासा तालुक्याती मंदिरातील टाळ चोरीचा गुन्हा पोलिसांनी २४ तासातच आणला उघडकीस, आरोपींना अटक
- शेतकऱ्यांनो! वास्तव स्वीकारून सात नंबर अर्ज भरा अन्यथा भविष्यात शेती धोक्यात येऊ शकते