राहुरी शहर : मुळा धरणातून नदी पात्रात तीन हजार क्यूसेकने काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली.
मुळा धरणाचा पाणी साठा २५ हजार ७३८ टीएमसी असून धरणात ३ हजार ४०० क्यूसेकने आवक सुरु असून धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरु आहे. धरण ९८ टक्के भरले आहे. मुळा उजवा कालव्यातून ९५४ क्यूसेकने तर मुळा डावा कालव्यात १४० क्यूसेकने पाणी सुरु आहे.

महिन्यात नदीपात्रात तिसऱ्यादा पाणी सूटत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी तुळजाभवानी मातेची पालखी निघणार असून पालखी मुळा नदी पार करून देसवंडी तमनर आखाडामार्गे पुढील प्रवासास जाते.
नदीला पाणी असल्यास रविवारी किती पाणी असेल, असा प्रसंग अनेक वर्षांनंतर येत असल्याने ते पाहाण्यासाठी भाविकांची उत्सुकता राहाणार आहे.