श्रीगोंदा : बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे हे दोन्ही तालुक्यातील नेते एकत्र आल्याने गटातटाचे राजकारण संपुष्टात आले आहे. आता खरे तालुक्याचे विकासपर्व सुरु होणार आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्याच्या पाणी प्रश्नात नागवडे -पाचपुते एकत्र आल्यामुळे घोड कुकडीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. असे मत नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे यांनी व्यक्त केले.
बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ शहरातून फेरी काढली होती. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी व तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी पाचपुते यांच्या पाठीशी उभे रहा. श्रीगोंदा शहराचा सर्वांगिण विकास व शहरातील विविध विकासकामासाठी पाचपुते आमदार नसतानाही कोट्यवधी रुपयांचा निधी आणला .

मागील काही गैरसमजुतीतून पाचपुते यांच्यापासून दूर राहावे लागले.पण आता पुन्हा शहराच्या विकासाच्या मुद्यावर आम्ही राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली पाचपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
- १०० वर्षांनंतर होळीला महासंयोग ! ३ राशींना मिळणार जबरदस्त फायदा आणि जीवनात होईल मोठा…
- EPFO खातेधारकांसाठी मोठी बातमी ! 31 मार्चपूर्वी हे काम नक्की करा
- Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांच्या मते, या 4 गोष्टी स्त्रिया कधीच उधार घेत नाहीत
- Post Office Investment : बँकेच्या FD ला विसरा! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांत पैसे दुप्पट
- Vivo S20 भारतात लाँच ! 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगसह