पाथर्डी : राज्यातील फडणवीस सरकारने सर्वच घटकांना झुलविण्याचे काम केले असून मराठा आरक्षणावरून सरकारने या समाजाची फसवणूक केली. मुस्लिम समाजाला आघाडी सरकारने दिलेले पाच टक्के आरक्षण भाजप सरकारने रद्द केले. फक्त भंपकबाजी करून भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, तरुण, महिला सुरक्षा, नोकर भरती यावर बोलण्या ऐवजी भाजप नेते काश्मीरचा विषय काढतात. त्याने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे पोट भरणार आहे का? तरुणांना नोकरी मिळणार आहे का? शेतमालाला भाव मिळणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला.

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी व पाथर्डी शहरात राष्ट्रवादीचे उमेदवार ॲड. प्रतापराव ढाकणे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी युवा नेते ऋ षिकेश ढाकणे, रामराव चव्हाण, श्री. पठाण, अकबर पटेल, अजिनाथ आव्हाड, मुन्नाभाई पठाण, संपत गायकवाड, नासीर शेख, संजय चितळे, रामभाऊ कर्डिले, रामेश्वर कर्डिले आदी उपस्थित होते.
शेख पुढे म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण करून त्यांच्याबद्दल बहुसंख्य समाजामध्ये शंकेचं वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने समाजात तेढ प्रस्थापित करण्याचे उद्योग थांबवले पाहिजेत. देशात आजपर्यंत असे गढूळ वातावरण कधीच नव्हते.
- मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….
- IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती! 10,277 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही
- अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना