पारनेर : राज़्यातील भाज़पा- शिवसेना युतीचे सरकार शेतकरीविरोधी असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते, असे प्रतिपादन पारनेर- नगर तालुका मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांनी केले.
नगर तालुक्यातील अरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, या वेळी लंके बोलत होते. या वेळी लंके म्हणाले, पारनेरसह नगर तालुक्यातील सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असून, दोन्ही तालुक्यांतून आपल्याला मोठे मताधिक्य मिळेल.
उद्याच्या काळात पक्षातील सर्व ज्येष्ठांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तालुक्यात येणाऱ्या विधानसभेत नक्कीच परिवर्तन होईल. आपण मतदार संघाच्या विकासाला प्राधान्य देणार असून, विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेल, असे शेवटी लंके म्हणाले.
- Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 266 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- बिग ब्रेकिंग ! पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला 300 कोंबड्यांचा मृत्यू, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
- Ahilyanagar Politics : नेवासा, श्रीगोंद्यातील ईव्हीएम तपासणीसाठी हालचाली सुरू !
- संजय राऊतांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 1 लाख रुपये ! अहिल्यानगरमधील हा नेता देणार बक्षिस…
- कोपरगावात दुध-साखर एकत्र येणं अशक्य ? विखे पाटील आणि कोल्हे…