तांदूळवाडी : शिवसेनेविषयी वावड्या उठविणारे फार झाले आहेत. मात्र, अफवांवर विश्वास ठेवू नका. युतीचा धर्म पाळा, शिवसेना आणि शिवसैनिक संपूर्ण ताकदीने आ. शिवाजीराव कर्डिले यांच्याच पाठीशी उभी राहणार असल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिली. दरम्यान आ. कर्डिले हे युतीच्या आगामी मंत्रिमंडळात मंत्रीच होणार असल्याचे खेवरे यांनी सांगताच शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
राहुरी येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. शिवाजीराव कर्डिले, भाजपाचे तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, सुभाष गायकवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय ढोकणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

खेवरे म्हणाले, राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून, कायापालट झाला आहे. सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी सतत संघर्ष करणारे नेतृत्व म्हणजेच आ. कर्डिले हेच असून, राहुरी तालुक्याला त्यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. खा. लोेखंडे व आ. कांबळे यांनी निवडणुकीनंतर राहुरी तालुक्यातील प्रवराकाठची व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेली गावे दत्तक घेऊन तेथे विकासकामे राबविण्याचे आवाहन खेवरे यांनी केले.
- Post Office Investment : बँकेच्या FD ला विसरा! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांत पैसे दुप्पट
- Vivo S20 भारतात लाँच ! 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगसह
- Small Business Ideas : केटरिंग बिझनेस कसा सुरू करायचा ? कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवण्याची संधी!
- Axis Bank Personal Loan : अॅक्सिस बँक देतेय 40 लाखांपर्यंत लोन ! असा करा अर्ज…
- Jio चा धमाका! 198 रुपयांत 2GB/Day डेटा आणि अमर्यादित कॉलिंग!