कोपरगाव : अटी आणि नियम यांच्याखाली ७० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून बाजूला ठेवले. राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एका ठिकाणी तर भाजपच्या शेतकरी कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशीच आत्महत्या करून तुमचे स्वागत करतो, अशी चिठ्ठी लिहून ठेवली. असे होत असेल तर ही सत्ता, राज्य कशासाठी आणि कुणासाठी? असा उद्विग्न सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे हे होते. याप्रसंगी उमेदवार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, संजीव भोर, पद्माकांत कुदळे, चैताली काळे, स्नेहल शिंदे, संभाजी काळे, सुनील गंगुले आदी यावेळी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, डॉ. अजय गर्जे व संतोष डागा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शरद पवार म्हणाले, सामान्य माणसांच्या हाताला रोजगार देणाऱ्या संस्था सरकारने बंद पाडल्या, ही बाब भूषणावह नाही. मात्र, सत्तेचा गैरवापर करून ईडीचे खटले दाखल करणाऱ्या या भाजपच्या सत्तेला त्यांची जागा दाखवून देऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
कलम ३७० आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संबंध काय, हे कलम या अगोदरही घटनेत होतं, ते फक्त बाजूला काढण्यात आलं.त्याला आमचा विरोध नाही, मग आठ राज्यात ३७१ का लावले नाही, अशी विचारणा करत या कलमाच्या आधारे राज्यातील व केंद्रातील सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप करून ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले, स्वाभिमान व शौर्याचा इतिहास आहे. हा इतिहास पुसून टाकण्याचे काम राज्य सरकार करीत असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे सरकार करू शकले नाहीत. इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकही त्यांना करता आले नाही, अशी टीकाही केली.
- आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शन धारकांना मिळणार अधिक लाभ ? कस ते वाचा….
- जन्मजात नशीबवान असतात कोणत्याही महिन्याच्या ‘या’ 3 तारखांना जन्मलेले लोक ! Pm मोदी सुद्धा आहेत त्यातील एक
- ‘हे’ 5 शेअर्स गुंतवणूकदारांवर पाडणार पैशांचा पाऊस ! मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेले शेअर्स देणार जबराट परतावा
- Aadhar Card च्या ‘या’ नियमांमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल ! आता….
- ‘या’ तारखांना जन्मलेले लोक अचानक होतात श्रीमंत ! १००% मिळवतात यश, झटपट यशस्वी होण्याचे सूत्र असते हाती













