अहमदनगर ;- शिवाजी कर्डिले हे भाजपचे आमदार असले, तरी त्यांची आजवरची भूमिका ही कायम पक्षविरोधीच राहिली आहे. सर्वच निवडणुकांत आमदार कर्डिले यांनी भाजप-शिवसेने विरोधात भूमिका घेत राष्ट्रवादीला मदत केली.
त्यामुळे कर्डिले यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे पत्रकाद्वारे करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रकावर माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा परिषद सदस्य, संदेश कार्ले, शरद झोडगे, अनिल कराळे, भाग्यश्री मोकाटे, पंचायत समिती सभापती रामदास भोर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पत्रकात म्हटले आहे की, आमदार कर्डिले यांनी कधीही युतीचा धर्म पाळलेला नाही. विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार गाडे असताना आमदार कर्डिले यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही कर्डिले यांनी युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना मदत न करता राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला.
महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात भूमिका घेत राष्ट्रवादीलाच मदत केली. राहुरी विधानसभा मतदारसंघातील मिरी, जेऊर आणि नागरदेवळे या गटात कर्डिले यांनी विरोध करूनही शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले. दुसरा कोणताही उमेदवार दिला, तरी शिवसेना युती धर्म पाळून प्रचार करेल, असे पत्रकात म्हटले आहे.
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख