गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी फक्त शेतकऱ्यांना द्यावे

Ahmednagarlive24
Published:

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पातील पाण्यावर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. उद्योगाला पाणी मिळाले पाहिजे. मात्र शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहू नये.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग प्राधान्याने शेतीसाठीच करावा, असे निर्देश पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिले.

मौदा येथील एनटीपीसी सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी झालेल्या बैठकीत एनटीपीसी ने आजपर्यंत गोसेखुर्दचे पाणी वापरले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्यामुळे शेती उद्योगावर संकट आले होते. शासन निर्णयानुसार एनटीपीसीने फक्त प्रक्रिया केलेले पाणी वापरावे.

त्याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या भांडेवाडी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र येथील पाणी वापरण्यात यावे असे निर्देश केदार यांनी दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत नागपूर महानगरपालिकेने भांडेवाडी येथील पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून प्रथम व द्वितीय चरणातून शुद्धीकरण करून

नागनदी व कन्हान नदी संगमपर्यंत आणावे व त्यानंतर एनटीपीसीने तिसऱ्या टप्प्यातील शुद्धीकरण प्रक्रिया करून आपल्या प्रकल्पात त्या पाण्याचा उपयोग करावा, असे स्पष्ट निर्देश यावेळी श्री.केदार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

गोसेखुर्द धरणातील पाण्यावर हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. त्याचा वापर हा शेतीकरिता व्हावा, असा विश्वास श्री.केदार यांनी व्यक्त केला.

या चर्चेत प्रमुख रूपाने सुरेश भोयर, तापेश्वर वैद्य, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जी.मो  शेख, लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता जयंत गवळी, गोसेखुर्द अधीक्षक अभियंता अंकुर देसाई व एनटीपीसीचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment