लॉकडाउन च्या काळात मूड अप करणारी मुखवटे, अहमदनगर आणि फक्त मराठी वाहिनीची ” रसिका मित्रहो ” मैफल

Ahmednagarlive24
Published:
                 मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अनेकांना अनेक अडचणी आल्या, सुरुवातीच्या आठवड्यात अनेकांना समजलंच नाही आपल्याबरोबर नेमकं काय होतंय?
घरात बसण्याची सुटलेली सवय आणि अशा काही काळात आपल्याला बाहेर जाता येत नाहीये यामुळे गेलेला मूड…
                 ही अडचण लक्षात घेऊन लोकांचा गेलेला आपला मूड थोडासा पुन्हा चांगला आनंदी करण्यासाठी
अहमदनगर मध्ये गेले वीस वर्षांपासून काम करत असलेल्या मुखवटे या संस्थेच्या डोक्यात एक कल्पना आली आणी सुरवात झाली रसिक मित्रहो ची या सगळ्यात फक्त मराठी वाहिनी आणि त्या वाहिनीचे बिझनेस हेड शाम मळेकर आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
              या संस्थेचे सगळे संस्थापक आणि सगळेच अध्यक्ष  सगळ्यांनीच असं ठरवलं की चला काहीतरी करूयात, पण काय? कारण घराबाहेर तर जाता येणार नव्हतं, मग मदत घ्यायची ठरली सोशल मीडिया ची. सध्याचे दिवस लोकांच्या दृष्टीनं थोडेसे मानसिक तणावाचे आहेत या काळात त्यांच्या मनावरचा ताण हलका करत त्यांचा हा डाऊन झालेला मूड आपल्याला छान  करायचा आहे.  त्यांना हसवता येईल यासाठी आपल्याला काय करता येईल यावर विचार सुरू झाला. मराठी साहित्यामध्ये अनेक दर्जेदार लेखक आणि त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहेत त्यातील काही निवडक साहित्य जे अत्यंत विनोदी, खुमासदार किंवा थोडसं लाईट मूडमध्ये आहे ते निवडलं गेलं आणि मुखवटे च्या वेगवेगळ्या कलाकारांनी रोज संध्याकाळी साडेपाच वाजता त्याचं वाचन करायचं ठरलं.
              आत्तापर्यंत म्हणजेच साधारण पाच एप्रिलला सुरू झालेल्या या प्रयोगाला आता जवळपास बारा दिवस पूर्ण होत आहे या 12 दिवसात अनेक वेगवेगळ्या कथा, लेख, पत्र , सादर करण्यात आलेत काही स्व लिखित साहित्य सुद्धा सादर करण्यात आले. पण हे सगळंच सादर करण्यामागचा उद्देश हा अत्यंत सरळ आहे. लोकांना आनंद देणं, आणि त्यांचा मूड छान करणे.
           आज खरंतर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयानं सुप्रसिद्ध असलेल्या पण आमच्या मुखवटे चा सुरुवातीपासूनच मेंबर पूर्णानंद वांढेकर हासुद्धा या प्रवासात सामील झालेला आहे. तो म्हणाला, बर्‍याच दिवसांनी आपल्या लोकांबरोबर काहीतरी नवीन, मजेदार सादर करण्याचा आनंद वेगळाच आहे.
      प्रसिद्ध आर. जे. चैत्राली ने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, फक्त प्रेक्षकांच नव्हे तर मुळात आमचाही वेळ एका सर्जनशील प्रकियेत गुंतला गेला, याचाही आनंद आहे. आणि तोच आनंद प्रेक्षकांना देण्याचा आम्ही आमच्या परीने पुरेपूर प्रयत्न करत आहोत.
          अनुया कळस्कर- बैचे जी आज सोयरे सकळ सारखे नाटक असेल किंवा अनेक चित्रपट मालिका असतील त्यात भूमिका केलेली कलाकार आहे तीसुद्धा मुखवटेची सुरुवातीपासूनची कलाकार तिने सुद्धा प्रतिक्रिया देताना संगीतले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना आम्ही लोकांचे मनोरंजन करू शकत आहोत, आपली कला त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत आहोत याचा आम्ही सुद्धा कलाकार म्हणून आनंद घेत आहोत.
              नगरमधील सुप्रसिद्ध निवेदक आणि कलाकार प्रसाद बेडेकर यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, ही संकल्पना अमित ने सांगितली तेव्हाच लक्षात आलं की यात एक वेगळीच मजा येणार आहे. म्हणूनच आत्तापर्यंत मी निवडलेल्या दोन्ही कथा या तश्याच निवडल्या होत्या.
        ट्रिपल सीट या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक आणि फक्त मराठी वाहिनीचा – वरीष्ठ कार्यकारी निर्माता
या नात्याने काम करत असणारा आणि या सगळ्या प्रोजेक्ट मागचा खरा ब्रेन असलेला संकेत पावसे म्हणाला की अनेक वर्षांपासून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आज आमच्यातले बरेचजण मुंबईत, पुण्यात किंवा नगरला आहेत त्यामुळे आम्हाला एकत्रित नाटक करता येत नाही पण ज्या वेळेला आमच्या सगळ्यांचा दिग्दर्शक आणि खास मित्र अमित बैचे म्हणाला की चलो यार कुछ करते है ! आणि या सगळ्याला सुरवात झाली.
               अमित बैचे अनेक सुप्रसिद्ध मालिकांचा आणि मराठी चित्रपटांचा लेखक, आणि मुखवटे संस्थेचा प्रमुख , त्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की खुप वर्ष झाली होती आम्ही सगळ्यांनी एकत्र काम करून, सगळेचजण आपापल्या कामात अडकले होते, पण या लॉक डाउन नि आम्हाला परत एकत्र आणलं, आणि या उपक्रमाला सुरवात झाली.
सुरवातीपासून एक गोष्ट पक्की डोक्यात होती लोकांना आपल्याला खुश करायचं मनापासुन हसवायचंय. या काळात रोज संध्याकाळी आपण ज्या वेळेला त्यांच्या समोर जाऊ त्या वेळेला ते त्यांच्या दिवसभरातले ताण तणाव किंवा या दिवसभरातल्या वेगवेगळ्या बातम्यांनी त्यांच्यामध्ये आलेली निगेटिव्हिटी आपल्याला कशी घालवता येईल ?
हे आपण करूयात. पण अर्थातच आमच्या ग्रुपचे नियम पाळून. म्हणजे तालमी कराव्या लागतील, आपण सादर करणार असलेल्या सादरीकरणाचे नेपथ्य, प्रकाशयोजना ,रंगभूषा ,वेशभूषा आणि अर्थातच स्क्रिप्ट कोणत असेल… हे सगळ ठरवलं गेलं आणि मगच
रसिक मित्र हो ला सुरुवात झाली.
‘फक्त मराठी’ सारखे एक अत्यंत मोठं चॅनल आज आमच्याबरोबर या प्रवासात आम्हाला साथ देतेय ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हा प्रवास इथून पुढे ही बरेच दिवस चालू राहावा अर्थातच लॉक डाउन मात्र लवकर संपावे असे वाटते आहे.
पण या निमित्तानं पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना एकत्र येण्याचा अनुभव मिळतो आहे.
पण मजा येतीये,लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय.अनेक मान्यवरांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत, हे खूप महत्वाचे आहे. आत्तापर्यंत मी स्वतः, राहुल दिकोंडा, चैत्राली जावळे, नितीन जावळे, प्रसाद बेडेकर, अनुया बैचे, पूर्णानंद वांढेकर, तृप्ती दिकोंडा , या सगळ्यांनी वाचन केलंय.
काही हजारच्या घरात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत, सोशल मीडिया या माध्यमाची ताकद सुद्धा या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना समजते आहे असेही अमित म्हणाला.आमचे अन्य सहकारी प्रसाद भणगे,  सतीश सातपुते आणि अतुल सातपुते हे सुद्धा पडद्यामागे राहुन अनेक तांत्रिक बाबींचे नियोजन करत आहेत.
ह्या सगळ्यात आम्हाला मोलाची साथ लाभली ती आमचा मित्र ब्रँड मेकर किरण गवतेची. ज्याने कार्यक्रमाच्या लोगो पासून विविध क्रिएटिव्ह पोस्टर ह्या उपक्रमा साठी केले आहेतया उपक्रमाने रसिकांसाठी मात्र एक मोठी मेजवानी मिळाली आहे यात शंका नाही.
–  प्रसाद भणगे
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment