रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीचे प्रचार साहित्य व माहिती पुस्तकाचे प्रकाशन

Ahmednagarlive24
Published:

चंद्रपूर, दि. 17 :  प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व निरोगी जीवन जगण्याकरिता जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते नियोजन भवन

येथे आयुष पद्धतीने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता विविध उपाययोजना, प्रचार साहित्य व माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एन.मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण जग कोरोना या आजाराशी झुंज देत असून सदर लढाई दीर्घकाळ लढावी लागणार असल्याचे व याकरिता आयुष विभागाने सुचविलेली जीवन पद्धतीतील बदल,

घरीच घेता येणारी औषधे व रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आपण कोविड-19 सारख्या आजारावर विजय मिळवू शकतो. असे आवाहन आरोग्य विभाग (आयुष) जिल्हा परिषद चंद्रपूरद्वारे करण्यात आले आहे.

ही माहितीपुस्तिका जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत यांच्या मार्गदर्शनात तयार झाली असून डॉ. अकील कुरेशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक बारापात्रे, डॉ.राजेश कामडे व डॉ.मोहसीन सय्यद यांनी त्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe