सोलापूर, दि.18:- मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन किराणा, भाजीपाला फळे तसेच औषधे, मिनरल वॉटर,
हॉस्पिटल उपचार इत्यादी माहितीसाठी व खरेदीसाठी नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांची व ग्राहकांची चांगली सोय होत आहे.
नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेणे एकदम सोपे आहे. अँड्रॉइड मोबाइल फोनच्या माध्यमातून ॲप डाऊनलोड करून घेऊन ग्राहकांना आवश्यक वस्तू खरेदी करता येते.
त्यानंतर त्यात मोबाईल नंबर आणि नाव माहिती भरावी. किराणा अथवा वस्तूंच्या विभागणीनुसार आयकॉनवर क्लिक करावे. ज्या भागात राहतो, त्या भागातील किराणा दुकानदार निवडावा.
त्यानंतर किराणा दुकानदारापुढे नमूद केलेल्या नंबरवर व्हाट्सएपसाठी क्लिक करावे अथवा कॉल करावा. त्यानंतर व्हाट्सएपच्या मेसेजमध्ये किराणा व साहित्य आणि नाव, पत्ता नमूद करून मेसेज सेंड करावा.
यामध्ये घरपोच सेवा देणाऱ्या सर्व दुकानांचा समावेश आहे. सदरची ऑर्डर आपण निवडलेल्या दुकानदारास त्यांचे मोबाईल व्हाट्सएपवर मिळणार आहे. दुकानदार ऑर्डर तयार करून घरी पाठवतील.
दरम्यान, आवश्यक असल्यास त्या दुकानदारांच्या मोबाईल क्रमांकावर ग्राहकांना कॉल करता येते. आपला नंबरसुद्धा त्यांचेकडे जात असल्याने आवश्यकता पडल्यास दुकानदार आपणाला फोन करतील,
तसेच माल पोहोच करण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असल्याने त्या बाबतीत ग्राहकाने दुकानदारासोबत योग्य तो समन्वय ठेवावा, असे आवाहन मंगळवेढा नगरपरिषद यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
https://drive.google.com/file/d/1m3x5epqvqpnvTCKfD378yA0i-lVSZX_o/view?usp=sharing या लिंकवरून ॲप डाऊनलोड करता येते.