कांबळे यांना श्रीरामपुरात काँग्रेसची उमेदवारी द्या

Published on -

श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवार द्यावा, यासाठी तालुक्यातील खिर्डी गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच प्रभाकर कारभारी कांबळे या तरुण तडफदार नेतृत्वास द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांना भेटून करण्यात आली.

खिर्डीचे लोकनियुक्त सरपंच प्रभाकर कांबळे यांच्यासह त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी करणारे शिष्टमंडळ काल आ. थोरात यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यात अनिल करपे, यशवंत भोसले, राजन भोसले, शिवाजी पवार, दादा माकोणे, दादा कांबळे, पोपट विटनोर, शिवाजी माकोणे, रावसाहेब थोरात, अरुण जाधव, अशोक माळी, कैलास पवार आदी प्रमुख यांनी आ.थोरात यांच्याकडे सरपंच प्रभाकर कांबळे यांना उमेदवारी द्यावी.

ते कांग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून खुल्या प्रवर्गातून लोकनियुक्त सरपंच झालेले आहेत. ७वर्ष त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कामकाज केले. गावातील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर व हनुमान मंदिराचे ते उपाध्यक्ष आहेत. २००७ ते २०११ या काळात त्यांनी खिर्डीचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

खासदार निधीतून व्यायाम शाळा, गावातील खळवाडी पाणी योजना मंजूर करुन गावचा पाणी प्रश्न सोडविला. श्रीरामपूर मध्यवर्ती जिल्हा दूध संघ, बाभळेश्वरचे ते ७ वर्ष संचालक होते. गावात त्यांनी स्मशानभूमी शेड, मागासवर्गीयांसाठी विकास कामे, पिण्याची पाईप लाईन, ग्रामपंचायत कार्यालय बांधून, घरकुल मंजूर केले.

त्यांचा ग्रामीण भागाबरोबरच शहरातही चांगला संपर्क असून काँग्रेसने स्थानिक उमेदवार म्हणून सरपंच प्रभाकर कांबळे यांना विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी प्रदेशाध्यक्ष आ. थोरात यांच्याकडे करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!