भोरमध्ये काँग्रेसला पळवून लावा : आदित्य ठाकरे

Published on -

भोर : गेली चाळीस वर्षे एकाच घराण्याकडे एकहाती सत्ता असूनही जनतेचा कायमच घोर निराशा केलेल्या काँग्रेसला भोरमधून पळवून लावा, असे आवाहन करीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी तालुक्याच्या विकासासाठी भोरमध्ये एमआयडीसी आणणार असल्याची ग्वाही दिली.

वरवे (ता. भोर) येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेने कोणतेही चांगले काम केले अथवा चांगला निर्णय घेतल्यास काँग्रेसच्या पोटात दुखू लागते. जे हात बळकटीचे भासविले त्याच हाताने मागील.

काळात गोरगरिबांच्या खिशात हात घालून लूट केली. सुजलाम सुफलाम नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात भगवा फडकविण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe