शेवगाव : राज्याच्या १५ वर्षामध्ये हजारो कोटीचे भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे राष्ट्रवादी कॉग्रस सरकार आणि त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या वेळी शेतकरी आणि पाणी प्रश्नावर काम करण्यास सुरवात केली मात्र या निवडणूकीत राष्ट्रवादीला तीस पेक्षा जास्त जागा मिळणार नसून त्यांचा सुपडासाफ होईल, असा प्रबळ दावा खा. सुजय विखे यांनी केला. महायुतीचे उमेदवार आ. मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ भातकुडगाव येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
विरोधी उमेदवार जातीपाती चे राजकारण करत आहेत, असा आरोप करत ते म्हणाले की, मतदार संघाचा इतिहास त्यांना माहिती नाही, पाटपाण्यासाठी टेलला असलेल्या गावांना पाणी पोहचविण्याचा प्रयत्न केला.

सर्व बंधारे शेतकऱ्यांना भरुन देण्यात आली. आहेत हे यांना अजून माहिती नसल्याचे टीका खा. विखे यांनी ॲड. ढाकणे यांच्यावर केली. राज्यात ३० पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीच्या येणार नाहीत. कॉग्रेस कुठे आहे, त्यांनाच माहीती नाही.
राज्यात निवडणुका असतांना राष्ट्रीय अध्यक्ष बॅंकॉकला फिरण्यासाठी गेले आहेत. इतकी विचित्र परिस्थिती आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघाचा विकास करण्यासाठी प्रामाणिक आणि शांत स्वभावाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, पाचवर्षाच्या काळामध्ये काम करत असतांना जात-धर्म किंवा शेवगाव-पाथर्डी असा कुठलाही दुजाभाव न करता केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न तसेच वैयक्तिक व सार्वजनिक सुख-दुखामध्ये सहभागी होण्याचे काम केले. परंतु सध्या स्वार्थासाठी काही पुढारी अचानक तिकीट घेउन जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून, समाजा-समाजामध्ये दुजाभाव बनविण्याचे काम करत आहेत.
त्यांची चाल जनतेने विचारात घेण्याचे काम आहे, मतदार संघात आकराशे कोटीचे काम केली विकास यांना माहिती नाही पण झालेल्या कामाचे भांडवल करत आहेत. पाण्याचे राजकारण करत असतांना त्यांना माहीत नाही की शेवगाव तालुका हा टेल शेवटला आहे त्यामुळे पाणी आणण्यात यश आले हे त्यांना माहितीच नाही, अशी कोपरखिळी त्यांनी ढाकणे यांना मारली.
- विद्यार्थ्यांनो, 16 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल ! नवीन वेळापत्रक पहा…
- SBI CBO Jobs 2025: पदवीधरांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! CBO पदाच्या तब्बल 2964 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती…
- …….म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय लांबणीवर ! राज्य कर्मचाऱ्यांचा डीए कधी वाढणार ?
- Railway प्रवाशांसाठी गुड न्यूज ! नागपूर रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी चालवली जाणार एक्सप्रेस ट्रेन, पहा….
- अगदी घरी बसून येईल तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स; प्रत्येक दुरूस्तीही होते घरच्याघरी, कशी? तर वाचा