अहमदनगर :- आगामी लोकसभा निवडणुकीत खा.दिलीप गांधी यांच्यावरील नाराजीचा फटका भाजपाला बसू नये यासाठी भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याबाबत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनाविचारणा झाल्याची माहिती समजली असून माजी मात्री पाचपुते यांनी लोकसभा निवडणुकीत स्वारस्य नसल्याने सांगितले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत खा.दिलीप गांधी यांच्यावरील नाराजीचा फटका भाजपाला बसू नये यासाठी भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात https://t.co/IWugB8srWm
— Ahmednagar Live24 (@Ahmednagarlive) March 2, 2019
गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले माजीमंत्री बबनराव पाचपुते हे दोन अपवाद वगळता श्रीगोंदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत आहेत.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. पवारांनी पाचपुते विरोधक एकत्र करीत त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला.
राजकारणात मुरलेले माजीमंत्री पाचपुते यांनी हा पराभव पचवत घरात न बसता पुन्हा एकदा उभारी घेत मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला.
पाचपुते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत. राज्यात काम करण्यातच जास्त स्वारस्य असल्याचे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचे सूत्राची माहिती आहे.
माजीमंत्री पाचपुते यांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. नगर दक्षिण मतदारसंघाची त्यांना बारकाईने माहिती आहे.
पाचपुते यांचे पंरपरागत विरोधक नागवडे यांना उमेदवारी दिल्यास भाजपकड़ून पाचपुते यांची उमेदवारी किफ़ायतशिर ठरू शकते, असा भाजपच्या वरिष्ठ पदाधिकार्यांचा व्होरा होता.
भाजपकडून माजीमंत्री पाचपुते यांना लोकसभा उमेदवारीबाबत विचारणा केली. मात्र, पाचपुते यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले.