अहमदनगर :- एमआयएम पक्ष मोदी प्रणित असून, छुपी युती उघड झाली आहे. शहरामधून ज्यांला एमआयएमची उमेदवारी देण्यात आली असून, त्याने महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता. अशा उमेदवारावर जनता विश्वास ठेवणार नाही.
अल्पसंख्यांक व मुस्लिम समाजाच्या विरोधात कोणताही कायदा भाजप शिवसेना सरकारने काढला, तेंव्हा शरद पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या मागे उभे राहून त्याला विरोध दर्शविला. मागील 5 वर्षात मुकुंदनगरसह शहराचा संग्राममय विकास झाला असल्याची भावना राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी व्यक्त करीत, संग्राम जगताप यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.

अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर येथील दरबारचौकात सभा घेण्यात आली. यावेळी महेबुब शेख बोलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक समद खान, बाबा खान, फारुक शेख, सलीम शेख, फयाज शेख, नसीम खान,
शम्स खान, खालीद शेख, बशीर शेख, उबेद शेख, सिताराम काकडे, खान सर, अत्तार खान, ऐजाज सय्यद, शहा निजाम, फिरोज खान, फारूक रंगरेज, अज्जू शेख, आबिद शेख, समीर खान, शकील करीम, वसीम पठाण, सलीम सय्यद, भैय्या बॉक्सर आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, मागील 25 वर्षापासूनची शहराची खेड्याची असलेली प्रतिमा पुसण्याचे काम 5 वर्षात केले. मुकुंदनगरला नवरुप देण्याचे काम माझ्या माध्यमातून झाले आहे.
रस्ते नसल्याने नागरिकांची मोठी अडचण होती. मात्र चांगले रस्ते देऊन येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. विकासासाठी कधीही धर्म, जात व पंथाचा विचार केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, लाखो रुपयांचा खर्च वाचणार, पहा…
- घरात साप शिरला तर घाबरू नका, फक्त ‘हे’ उपाय करून पहा, साप असा पळणार की परत मागे फिरणार पण नाही