अहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, नगर दक्षिणेची जागा ही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याने या जागेचा तिढा सुटण्याऐवजी आणखी वाढला आहे.
नगर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या मतदारसंघातून राजीव राजळे यांना उमेदवारी दिली होती.
या जागेवर राष्ट्रवादी उमेदवार देणार असून, तो उमेदवार कोण? हे मात्र अद्यापि निश्चित झाले नसले, तरी काँग्रेसकडून या मतदारसंघातून विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे हे इच्छुक आहेत.
राधाकृष्ण विखे यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी ही जागा विखे यांना सोडल असे वाटत असताना शुक्रवारी ही जागा काँग्रेसला सोडल्याची चर्चा सुरू झाली.
मात्र ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याने या जागेचा तिढा सुटण्याऐवजी आणखी वाढला आहे.