नागपूर, दि.20 : निर्मल जिनिंग अँड प्रेसिंग सालई खुर्द कोंढाळी येथे आज महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कापूस संकलन केंद्राचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
शुभारंभाचा वजनकाटा सावळी खुर्द ता. काटोल येथील शेतकरी सुमन गुलाब परबत यांच्या कापसाचा करण्यात आला.
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी आमदार गिरीश गांधी, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, अधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.