इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञा पत्रात माहिती लपवणाऱ्यांची चौकशी होत नाही. मात्र ज्या संस्थेचा संचालक वा सभासदही नाही अशा प्रकरणात माझे नाव गोवले जाते. काय चौकशी करायची ती करा, ‘लय बघितल्यात’ काळजी करायचे कारण नाही, असा इशारा महायुतीच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिला. भाजपाचे सरकार दडपशाहीचे राजकारण करत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
ते इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत बोलत होते.. शरद पवार म्हणाले, सरकारला शेतक ऱ्यांची किंमत नाही. तरूणांची बेरोजगारांची संख्या, महागाई वाढतच चालली आहे. सरकार चालवताना शेतकरी हिताची काळजी घ्यावी लागते. युवकांच्या हातांना काम देण्यासाठी धोरण आखले पाहिजे.

या पातळीवर या सरकारची कामगिरी पाहता सर्वत्र नैराश्य पहायला मिळते. ते म्हणाले, शिखर बँक प्रकरणी इतर पक्षातील संचालक असताना अजित पवार यांचेच नाव घेतले जाते. इतरांचे नाव घेतले जात नाही. बारामतीतील साखर कारखान्याचा सभासद असताना माझे नाव ही घेतले गेले. हा सारा प्रकार दडपशाही राजकारणाचा आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना किंमती ठरवण्याचा अधिकार नाही. सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु वाळवा तालुक्यात एकही आत्महत्या झाली नाही हे खऱ्या अर्थाने विकासाचे द्योतक आहे. जयंतरावांच्या या प्रचाराच्या शुभारंभाचा विजयी संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवणार आहे.
- अहिल्यानगर मधील बनावट GR प्रकरणात मोठी अपडेट ! ‘त्या’ ठेकेदारावर गुन्हा दाखल, प्रशासन हादरलं !
- Samsung Galaxy Z Fold 7 लाँच ! 200MP कॅमेरा, AI फीचर्स, किंमत ऐकून थक्क व्हाल!
- अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी नगर – मनमाड महामार्ग…
- म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करताय? मग ‘हे’ 8 नियम नक्की समजून घ्या!
- कुठे चाललोय आपण?, देशातील सहावीच्या मुलांना साधा गुणाकारही जमेना, भागाकार तर दूरच! सरकारी सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासे