कर्जत-जामखेड मतदार संघातून भाजपाचे उमेदवार ना. प्रा. राम शिंदे ४ ऑक्टोबर रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ना. शिंदे यांच्या प्रचारार्थ साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले हे कर्जतला पहिल्यांदाच येणार आहेत.
माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या वतीने मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. विरोधकांना कडवे आव्हान देण्यासाठी साताऱ्याचे उदयनराजे भोसले कर्जतला येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले विरोधकांवर कोणती टिकेची तोफ डागणार याकडे लक्ष लागले आहे.

- मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! CSMT वरून धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकात मोठा बदल
- भारतात 1853 मध्ये पहिली ट्रेन धावली, पण जगातील पहिली प्रवासी रेल्वे कुठे धावली? वाचा इतिहास
- जगातील सर्वात मोठं स्टेडियम कोणतं?, टॉप-5 यादीमध्ये भारताच्या ‘या’ स्टेडियमचंही नाव!
- अंतराळातून परतल्यानंतर शरीरात काय बदल होतात?, शुभांशू शुक्लाच्या आयसोलेशनमागे आहे मोठं विज्ञान!
- कसोटीत सहाव्या नंबरवरून सर्वाधिक 50+ धावा करणारे टॉप-5 भारतीय फलंदाज!